भंडारा :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृह सुरू झालेली असून सन 2023-24 या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना वसतिगृहामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी शासकीय वसतिगृहातून प्रवेश अर्ज प्राप्त करुन त्वरीत सादर करावा. वसतिगृह प्रवेशाबाबत अधिक माहितीकरिता वसतिगृहांचे गृहपाल यांच्याकडे त्वरित संपर्क साधावा व जास्तीत जास्त मागसवर्गीय विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.