भंडारा : दुर्मीळ होत चाललेल्या सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करावा असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज दिले. सारस संवर्धनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, उपवनसंरक्षक श्री. गवई, अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, सावन बाहकर उपस्थित होते.
बंदी असलेल्या कीटकनाशकाबाबत कृषी केंद्रांना अवगत करण्यात यावे. सारस संवर्धनासाठी सारसमित्र म्हणून गावागावात तरुण तरुणींना ओळखपत्र देण्यात यावे. सध्या जिल्ह्यात सारस पक्ष्यांच्या 2 जोड्या असून त्याच्या अधिवास क्षेत्रात वन विभागामार्फत देखरेख करण्यात यावी. पुढील 15 दिवसात कृषी, पारेषण, महसूल विभागांनी माहिती एकत्रित करून आराखडा तयार करून द्यावा, असे श्री .कदम यांनी सूचित केले.