गुरुमाऊली येथे झोन ९ मधील अमृत पाणीपुरवठा योजनेचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

चंद्रपूर, ता. १६ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. महाकाली मंदिर परिसरातील गुरुमाऊली येथे झोन ९ मधील योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा मंगळवार, ता. १६ नोव्हेंबर रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडला.

महाकाली मंदिर प्रभागातील बाबुराव गंधेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या लोकार्पण सोहळ्याला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढई, नगरसेवक नंदू नगरकर, नगरसेविका अनुराधा हजारे, नगरसेवक निलेश खोब्रागडे, नगरसेविका कल्पना लहामगे यांची प्रमुख उपस्थिती होती. अमृत योजनेच्या झोन ९ अंतर्गत ५ लाख क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. येथील ८.७ किमीची पाईपलाईन उभारण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाली असून, नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा सुरु होणार आहे. या भागात ६६० घरी नळ कनेक्शन देण्यात आले आहे.

मंगळवारी पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला उपअभियंता अनिल घुमडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे विवेक ताम्हण यांची उपस्थिती होती.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com