नागपूर :- दिनांक २९/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलींग करीत असता गुप्त माहिती मिळाली की, पो.स्टे, कन्हान हदीत बोर्डा टोल नाका येथे काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्देयतेने कोंबून वाहतुक करीत आहे, अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता आयशर ट्रक क्रमांक एम. एच. ४८/सौ. क्यू ५८०८ हे संशयीत वाहन मिळुन आल्याने त्या वाहना जवळ जावुन त्याची पाहणी केली असता सदर वाहनात आरोपी नामे १) शिवसागर जगन्नाथ मिश्रा, वय ४१ वर्ष, रा. नालासोपारा इंस्ट पालघर मुंबई. (२) रामभरोसे रमेश यादव, वय ३३ वर्ष, रा. मुसा खांड चकिया, उत्तर प्रदेश यांनी गौवंश जनावरांना अत्यंत क्रूर व निर्दयतेने वाहनात डांबुन आखुड दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीत अपुऱ्या जागेत कोंबुन कत्तलीसाठी अवैध्यरित्या घेवुन जातांना मिळुन आल्याने त्वाच्या ताब्यातुन १) एकूण १० गोवंश प्रत्येक गोवंश किंमती २०,०००/- रू. प्रमाणे एकूण २,००,०००/- रुपये २) आयशर ट्रक क्रमांक एम एच ४८/सी क्यू ५८०८ किंमती १०,००,०००/-रू. साये एकूण गोवंश व वाहन किंमती १२,००,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून अशा एकूण १० गोवंश गो शाळेत जमा करून ट्रकचे चालक व मालक यांचे विरुद्ध कलम ११ (१) (ड) प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम ५(१) (२.) ९ प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये कार्यवाही करण्यात आली, जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे कन्हान यांने ताब्यात देवून आरोपों विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस अनिरीक्षक बटुलाल पांडे, सहायक फौजदार नाना राउत, पोलीस हवालदार विनोद काळे, इकबाल शेख, मंजू बड़ोदिया, चालक पोलीस हवालदार मोनू शुक्ला, पोलीस अंमलदार निलेश इंगुलकर यांनी पार पाडली.