नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असता दिनांक १५/०३/२०२४ रोजी ०१/०० वाजता दरम्यान पोलीस अधीक्षक यांचे आदेशानुसार बुटीबोरी येथे जाऊन वर्धा रोड येथील कोळसा टालचे समोरील जागेत काही इसम चोरीचा लोखंडी टीमटी सरिया मुद्देमाल आपले जवळ बाळगून त्या ठिकाणी आहेत अशी माहिती मिळाल्याने स्टाफ सह कुही हद्दीतून पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे पोहचून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता चंदेल यांचे शेतात वेगवेगळया जाडीच्या ७००० किग्रॅ वजनाच्या लोखंडी सळाया एकूण किंमती ३८५०००/- रू. चा माल मिळून आला. सदर मुद्देमाला बाबत सकाळी २/०० वा. ते १४/०० वाजता पर्यंत मूळ मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मूळ मालक मिळुन न आल्याने ज्या इसमाच्या ताब्यात मुद्देमाल मिळून आला त्याने सदर मुद्देमाल कुठून तरी चोरी करून आणला असावा असा संशय निर्माण झाल्याने इसम नामे- साजिद खान मोहम्मद कासिम खान राहणार कामगार नगर नागपूर याचे विरुद्ध इस्तगाशा नोंद करण्यात आला.
जप्त मुद्देमाल व कागदपत्रे व इसमास पुढील कायदेशीर प्रक्रिया करिता पोलीस स्टेशन बटुटीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पोलीस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मयूर देकले, पोलीस अंमलदार राकेश तालेवार, चालक आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.