जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध कारवाई

नागपुर :- पो.स्टे. एम.आय.डी.सी. बोरी अंतर्गत काठीवाडचाच्या समोर नागपुर वर्धा रोड येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे ०५.०० वा. दरम्यान एम. आय. डी. सी. बोरी पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, टाकळघाट शिवारात नागपुर वर्धा रोड ने काठीवाडी धावा समोर काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने काबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून एम.आय.डी.सी. बोरी पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता एक बिना नंबरचे बोलेरो पिकअप संशयीत वाहन मिळून आल्याने त्या वाहना जवळ जावून त्याची पाहणी केली असता सदर वाहनात एकुण चार पांढया रंगाचे व दोन लाल रंगाने जनावरे निर्दयतेने कोंबलेले, त्या जनावरांचे पायाला व तोंडाला दोरीने बांधुन दिसले यावरुन वाहन चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव आरोपी चालक नामे विनोद हरिचंद्र खेडकर वय ३२ वर्ष रा. भुगाव ता. कामठी जि. नागपुर व त्याचे शेजारी बसलेला निखील कैलास बनकर वय २५ वर्ष रा. किन्ही ता. कुही जिं. नागपुर ह. मु. भुगाव ता. कामठी जि. नागपुर असे सांगीतले सदर जनावरां बाबत विचारपुस केले असता सदर जनावरे है शिहोरा बाजार ता. जि. भंडारा येथुन आणुन यवतमाळ येथे कतलखान्यात कटाई करीता घेवुन जात असल्याचे सांगीतले. सदर वाहन चालकास जनावरांचे व वाहनाचे कागपत्रा बाबत विचारले असता त्यांचेकडे जनावरा बाबतचे कोणतेही कागद पत्र नसल्याचे सागीतले तसेच सदर जनावरे हे स्वतः विकत घेतल्याचे सांगितले. सदर वाहना संवधा कागदपत्रे तसेच वाहन चलवण्याचा परवाना मिळून आला नाही. सदर वाहनामध्ये ०४ पांढरे रंगाचे बैल व ०२ लाल रंगाचे बैल असे एकुण २६ जनावरे किंमत अंदाजे ६०,०००/- रु. व बोलेरो पिकअप क्र. MH 40.CM 0595 किंमती अंदाजे ९,००,०००/- रु. असा एकूण वाहनासह ९,६०,०००/- रु. चा मुद्देमाल आरोपींकडुन जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोउपनि शिवाजी मारोती भताने, वय ४५ वर्षे पोलीस स्टेशन MIDC बोरी यांचे रिपोर्टवरून पोस्टे एमआयडीसी बोरी येथे आरोपीविरुद्ध कलम १९(१) (क) प्राण्याचा छळ प्रति अधि, कलम ५११) १५४२) म.प.सं.अधि. कलम ३४ भादवि कायदाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोस्टे एमआयडीसी बोरी हे करीत आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करून चोरट्याने केला वीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास

Tue May 2 , 2023
काटोल :- पो.स्टे. काटोल अंतर्गत ढिवरवाडी येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे ०८/०० वा. ते २०/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- रत्ना मुकूंदराव बॉवल, वय ४५ वर्षे, रा. दिवरवाडी ता. काटोल ही आपल्या परीवारासह स्वतःचे बहीणीचे लग्नाकरीता काटोल येथे आली होती. दि. ३०/०४/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा. फिर्यादीचे पती व मुलगा असे दोघेही घरी येवून आंघोळपणी करून सकाळी ०८/०० वाजता लग्नाचे कार्यक्रमाकरीता काटोल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!