घरफोडी करून चोरट्याने केला वीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास

काटोल :- पो.स्टे. काटोल अंतर्गत ढिवरवाडी येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे ०८/०० वा. ते २०/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- रत्ना मुकूंदराव बॉवल, वय ४५ वर्षे, रा. दिवरवाडी ता. काटोल ही आपल्या परीवारासह स्वतःचे बहीणीचे लग्नाकरीता काटोल येथे आली होती. दि. ३०/०४/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा. फिर्यादीचे पती व मुलगा असे दोघेही घरी येवून आंघोळपणी करून सकाळी ०८/०० वाजता लग्नाचे कार्यक्रमाकरीता काटोल येथे परत आले होते. फिर्यादी ही परीवारासह दिवसभर लग्नाचे कार्यक्रमात काटोल येथे हॉलमध्ये हजर होती सायंकाळ पर्यंत हॉलमध्ये धाबुन सायंकाळी ०८/०० वाजता फिर्यादी हो परीवारासह घरी ढिवरवाडी येथे परत गेलो असता कोणीतरी अनोळखी इसमाने घराचे दरवाजाचे कुलूप तोडुन कपाटाचे लॉकरमधील २ ग्रॅम वजनाचे सोन्याची कानातील रिंग किमती अंदाजे १०,०००/-रू. व नगदी १००००/- रु. असा एकूण २०,००० /- रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अनोळखी इसमाने घरात प्रवेश करून चोरून नेला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. काटोल येथे आरोपीविरुद्ध कलम ४५४, ३८० नादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा गौरव आगरकर व नं. ८९१ पोस्टे काटोल मो. क्र. ८४२९७५५८४९ हे करीत आहे.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com