आशीनगर झोनमधील ८ थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे आशीनगर झोनमधील ८ थकबाकीदारांवर सोमवारी (ता.२८) कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये आठही थकबाकीदारांकडील साहित्य जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल)मिलींद मेश्राम यांच्या आदेशान्वये आशीनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राउत यांच्या नेतृत्वातील पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

कुलदीप कौर बलविंदरसिंग सग्गु, (जगत सेलीब्रेशन हॉल, पावरग्रीड चौक, नागपूर), देवेन्द्र नामदेवराव पवार (पवार सावजी भोलनालय, पाटणकर चौक, नागपूर.), भिषण भाऊ मुकेश भा. उमेश संतलाजी हासानी, प्रितमसिंग चरणसिंग गुज्जर, प्लॉट नं. १२९, १२९ / अ (गुज्जर लॉन, पाटणकर चौक, नागपूर), प्रतिभा अश्विन शंभरकर व इतर अशी मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे आहेत.

कुलदीप कौर बलविंदरसिंग सग्गु (जगत सेलीब्रेशन हॉल, पावरग्रीड चौक, नागपूर.) यांच्यावर रू. ९,८८,२२०/- मालमत्ताकर थकीत होता. सदर थकीत मालमत्ता कराचा भरणा मौक्यावर न केल्याने त्यांची अचल मालमत्तासह मौक्यावर असलेले सर्व टेबल खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले असुन सुपुर्दनाम्यावर दर्ज मालमत्ताधारक यांना सुपुर्द करण्यात आले.

देवेन्द्र नामदेवराव पवार (पवार सावजी भोलनालय, पाटणकर चौक, नागपूर.) यांच्यावर रू. १,१७,४८६ /- मालमत्ताकर थकीत होता. सदर थकीत मालमत्ता कराचा भरणा मौक्यावर न केल्याने त्यांची अचल मालमत्तासह मौक्यावर असलेले सर्व टेबल खुर्ची व इतर साहित्य जसे भोजनालय मधील वापरित असलेले २ मोठे फ्रीज, १७ खुर्ची, ४ टेबल व टी.व्ही. जप्त करण्यात आलेले असुन सुपुर्दनाम्यावर दर्ज मालमत्ताधारक यांना सुपुर्द करण्यात आले.

भिषण भाऊ मुकेश भा. उमेश संतलाजी हासानी यांच्यावर थकीत मालमत्ताकरापोटी रू. १,५०,५६३/- थकीत असुन दर्ज मालमत्ताधारक यांनी मौक्यावर कराचा भरणा न केल्याने त्यांचे १५०० चौ.फु. चे खुले भुखंड व त्यावर कच्चे स्वरूपाचे बांधलेले १०० चौ.फु. चे १ रूम व त्या रूममध्ये असलेले २ खुर्च्या, १ टी. व्ही. व १ मोटर सायकल जप्त करण्यात आलेले असुन सुपुर्दनाम्यावर दर्ज मालमत्ताधारक यांना सुपुर्द करण्यात आले.

प्रितमसिंग चरणसिंग गुज्जर, प्लॉट नं. १२९, १२९ / अ (गुज्जर लॉन, पाटणकर चौक, नागपूर) यांच्यावा रू. ७,८८, ५६८/-, रु. २,४५, ५६०/- असे २ लॉन मिळुन एकुण रू. १०,३४,१२८/- मालमत्ताकर थकीत होता. व सदर्ह थकीत मालमत्ता कराचा भरणा मौक्यावर न केल्याने त्यांची अचल मालमत्तासह मौक्यावर असलेले सर्व टेबल खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले असुन सुपुर्दनाम्यावर दर्ज मालमत्ताधारक यांना सुपुर्द करण्यात आले.

प्रतिभा अश्विन शंभरकर व इतर यांच्या मालकीचे घराचे एकुण रू. ६,३६,५२१ /- मालमत्ताकर थकीत असल्याने संबंधीत घरमालक यांनी प्रत्येक वेळेस थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. परंतु मौक्यावर कोणतेही अचल मालमत्ता उपलब्ध नसल्याने जप्त करण्यात आलेली नाही. केवळ त्यांचे राहते घर (स्थावर मालमत्ता) जप्त करण्यात आली.

या कारवाईमध्ये प्रमुख अनिल कऱ्हाडे (सहाय्यक अधिक्षक), सचिन मेश्राम, कर निरीक्षक, मनोज नाईकवाडे, कर निरीक्षक कवडु बहादुरे, कर निरीक्षक व या वार्डाचे कर संग्राहक  शशिभूषण वालदे व प्रदीप तुंबडे यांनी सहकार्य केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान शहर विकास मंच ने 26/11 के शहीदों को किया नमन 

Tue Nov 29 , 2022
कन्हान :- मुंबई में 26 नवंबर 2008 में हुए हमले में शहीदों को कन्हान शहर विकास मंच द्वारा तारसा रोड शहीद चौक में श्रद्धांजलि अर्पित की गई । मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे के हाथों शहीद स्मारक पर पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन किया गया । पश्चात सभी मंच पदाधिकारियों व सदस्यों ने शहीद स्मारक पर पुष्प अर्पित कर व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com