सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ५२ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई                           

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (ता.२३) रोजी उपद्रव शोध पथकाने ५२ प्रकरणांची नोंद करून ३८,००० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २४ प्रकरणांची नोंद करून ९६०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून ४०० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ६००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०८ प्रकरणांची नोंद करून १०,००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकाम मलबा टाकून कचरा टाकणे/साठवणे, प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविणे या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ७००० रुपयांची वसुली करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘इंडिया’ आघाडीत उभी फूट? ममता बॅनर्जीनंतर ‘आप’नं पंजाबमध्ये घेतली ‘एकला चलो रे’ची भूमिका

Wed Jan 24 , 2024
नवी दिल्ली :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीला ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यानं ‘इंडिया’ आघाडीला एकच धक्का बसला आहे. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडलीय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणूक स्वबळावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com