अचिव्हर्स जिम्नॅस्टिक ॲकेडमीला दुहेरी विजेतेपद, खासदार क्रीडा महोत्सव : जिम्नॅस्टिक स्पर्धा

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये अचिव्हर्स जिम्नॅस्टिक ॲकेडमीने सर्वसाधारण दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. धनवटे नॅशनल कॉलेज येथे पार पडलेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये अचिव्हर्स जिम्नॅस्टिक ॲकेडमीने मुलांच्या आर्टिस्टिक आणि मुलींच्या रिदमिक प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.

स्पर्धेमध्ये मुलींच्या आर्टिस्टिक प्रकारात शिवाजी जिम्नॅस्टिक क्लबने जेतेपद प्राप्त केले. तर ॲक्रोबेटिक्स प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मानकापूर संघाने केली.

आर्टिस्टिक, रिदमिक आणि ॲक्रोबेटिक्स या तिनही प्रकारात 10, 12, 14, 15, 17 वर्षाखालील वयोगटासह खुल्या गटात स्पर्धा घेण्यात आली. सर्व वयोगटातील विजेत्यांना 1500, 1 हजार आणि 700 रुपये रोख असे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)

आर्टिस्टिक

10 वर्षाखालील मुले : आरव अंतुरकर, औरशूम सांगोलकर, ऍशले साळवे.

मुली : आशी राळेगणकर, ईश्वरी खडतकर, गुंज राणे

12 वर्षाखालील मुले : अर्चित वनवे, प्रथम गायधने, समर वानकर

मुली : आराध्या लाखे, इहा चांडक, वसुंधरा हिवासे

14 वर्षाखालील मुले : कैवल्य फाटिंग, जयकृत सुचक, तनय धोपडे

15 वर्षाखालील मुली : मधुरा कलाणे, माही कोरडे, रमणी गावपांडे

17 वर्षाखालील मुले : इशान काळबांडे, दर्शील चंदनखेडे, अरीन पंडित

खुलागट मुले : अनिश बेहेरे, रुषिकेश वराडे, अर्पित खानपसुडे

खुलागट मुली : पुण्या अतुरकर, संमती भालधरे, केया गजभिये

रिदमिक

10 वर्षाखालील मुली : श्रेया पराडकर, आशी राळेगणकर, श्रीमयी कलाणे

12 वर्षाखालील मुली : आराध्या लाखे, अन्विषा राठी, प्रवर्तिका सोनाने

15 वर्षाखालील मुली : कनक समुद्रे, अवनी राठोड, मधुरा कलाणे

खुलागट मुली : लक्ष्मी साठवणे, केया गजभिये, अदिती वर्मा

ॲक्रोबेटिक्स

पुरुष दुहेरी : तनय धोपडे-आदित्य पाटील, उदय रामटेके-भूषण पिड्डा, आरीन पंडित

महिला दुहेरी : अवनी राठोड-खनक जैन, प्राची पारखी-अल्फिया, रुचा-रहिन्‍या

मिश्र दुहेरी : आराध्या-मंथन, निकुंज-अभया, मन-अदवी

महिला तिहेरी : अक्षयी-संबध्दी-गरिमा, सान्वी-प्रत्युष्या-माही, आदिती-सायली-सृष्टी

पुरुष गट तिहेरी : भूषण-सागर-सुजल, वेदांत-प्रीतम-यमित, ओम-अनिरुद्ध-तनय, आदित्य-निक्षुंज-ऋषिकेश

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आनंदोत्सव

Tue Jan 23 , 2024
मुंबई :- अयोध्या येथील भव्य मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी प्रचंड जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रदेश कार्यालयात अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एल ई डी स्क्रीनद्वारे दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अयोध्येतील मंदिरात विधिवत प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.मिठाई वाटपही करण्यात आले. यावेळी रामभक्तांनी केलेल्या प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने आसमंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com