कळमन्यातील सराईत गुन्हेगारास रेल्वेतून अटक

– गोंडवाना एक्सप्रेसमधील घटना

नागपूर :-कळमना पोलिस ठाण्यांतर्गत रहिवासी एका सराईत गुन्हेगाराने गोंदिया रेल्वेस्थानकावर मोबाईल चोरला. घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रोशन लारोकर (24) रा. पार्वतीनगर, कळमना असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

बालाघाट येथील रहिवासी फिर्यादी कपिल उके (30) हा गाडी क्रमांक 12409 गोंडवाना एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत रोशनने त्याच्या पॅण्टच्या खिशातून मोबाईल चोरला. काही वेळातच कपिलला मोबाईल चोरी झाल्याचे समजले. त्याने लगेच लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी मोबाईल चोराचा शोध घेतला.

दरम्यान दक्षिण-पूर्व-मध्य आरपीएफचे जवान नासीर खान आणि गुन्हे शाखेचे राजेंद्र रायकवार यांनी शोध घेऊन रोशनला पकडले. विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गोंडवाना एक्सप्रेसमधून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. झडती घेतली असता त्याच्याजवळ मोबाईल आढळला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com