ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

नागपूर :-दिनांक २०/०७/२०२३ रोजी फिर्यादी नामे रामानजीयेलु बन्नावेलमंडा गोटीपाटी, वय ५२ वर्ष रा. येलनंदा वेमारामन ता. बळीकुर्वा जि. बापटला आंध्रप्रदेश ह. मु. साळवा ता. कुडी हा अग्रवाल रा. नागपुर यांची २० एकर शेती ३ लाख रू. मध्ये ठेक्याने करीत होता. त्या जागेवर फिर्यादी याने आपले ट्रॅक्टर क्र. ए. पी. ३९ एस. यु.- ०५८० व ट्राली क्र. ए.पी.- ३९ एस. यु-०८२२ अंदाजे किंमती ५,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल फिर्यादी याने शेतात खाली जागेत ठेवलेला कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेला आहे. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोस्टे कुही येथे अप क्र. ३०२/२३ कलम ३७९, ३४ मादवि, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे समांतर तपासा दरम्यान घटने वेळी एक पांढर्या रंगाची datsun car संशयितरित्या घटनास्थळाचे जवळ संशयितरीत्या फिरलेली असल्याची गुप्त माहिती पथकास मिळाली. माहिती प्राप्त झालेल्या कारचा शोध घेत असतांना  दिनांक २३/०७/२०२३ रोजी तश्याच car मध्ये तिन इसम नागपुर उमरेड रोडवर फिरत असल्याचे महिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून बायपास चौक उमरेड येथे पांढया रंगाची DATSUN कार क्र. MH ०९ EU ६२८७ हिला थाबवून त्यातील तिन इसम नामे आरोपी नामे १) कामेश्वर देशमुख २) मंगेश भोंगाडे दोन्ही रा. अंभोरा ह. मु. हिंगणा नागपूर ३) फैजण शेख रा. भंडारा यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेवून त्यांना विचारपूस केली असता दिनांक १०/०७/२०२३ रोजी रात्री दरम्यान त्यांनी याच कारने जावून ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करून गिरन्हाईक पाहून विकण्याचे उद्देशाने पवनी जि. भंडारा येथील नहरापासून जाणान्या टोळी येथे लपवून ठेवले असल्याचे सांगितले. यावरुन त्याचे ताब्यातून १) चोरीस गेलेला ट्रॅक्टर क्र. AP ३९०५८० व ट्रॉली क्र. APSU ०८२२ क्रमांकावर पांढरा पेंट लावलेला किंमती अंदाजे ५,००,०००/-रु. २) गुन्हयात वापरलेले वाहन DATSUN कार क्र. MH ०९ EU ६२८७ किंमती अंदाजे ३,००,०००/- असा एकूण ८,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून जप्त मुद्देमालासह आरोपींना पोलीस ठाणे कूही यांचे ताब्यात दिले आहे..

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात परी सहायक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार अनिल म्हस्के सा. (भा.पो.से.), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखंडे, पोलीस हवालदार अरविंद भगत, पोलीस नायक बालाजी साखरे, रोहन डाखोरे, पोलीस शिपाई राकेश तालेवार वाहन चालक आशिष बोरकर यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध कारवाई, वाहनासह एकूण ३६३०००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Fri Jul 14 , 2023
उमरेड :- पोलीस स्टेशन उमरेड येथील स्टाफ हा शासकीय वाहनाने पोस्टे उमरेड हद्दीमध्ये पेट्रोलिंग व अवैध रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करणेकामी दिनांक १२/०७/२०२३ रोजी सकाळी ०७.३० वा. ते ०८.३० वा. दरम्यान पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की काही ट्रकमध्ये अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन उमरेड येथील स्टाफ यांनी मोहपा फाटा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com