नागपूर :- फिर्यादी अंकीत कैलास वानखेडे वय २७ वर्ष रा. गल्ली न. १, चंद्रमणी नगर, रामेश्वरी रोड, अजनी, नागपुर हा घरी असतांना त्याचा मित्र नामे सुरज उर्फ विहारी अमोर महतो वय २६ वर्ष रा. बालाजी नगर, नाल्याजवळ, अजनी, नागपुर हा फिर्यादीचे घरी आला. सुरज त्याचे फोनवर गुप्ता नावाचे ईसमासोबत शिवीगाळी केल्यावरून वाचाबाची, वाद करीत होता. सुरजने फिर्यादीस आपले सोबत चलण्यास म्हटले व गाडीवर बसवुन ते ओमकार नगर ते मानेवाडा रिंग रोड, नाईक नगर टर्निंगवर, नमन फुट वेअर दुकानाजवळ गेले असता, त्या ठीकाणी तिन इसम ऊभे होते. फिर्यादीचा मित्र सुरज हा बाईकवरून खाली उतरला व त्याने एकाची गच्ची पकडुन “गुप्ता तूने मेरेको गाली कैसे दिया” असे म्हटले असता गुप्ता व त्याचे दोन साथिदारांनी फिर्यादीचा मित्र सूरज याचा घेराव करून त्यांचे जवळील चाकू व त्रिशूलने वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादीने त्यांना मारू नका असे म्हटले असता फिर्यादीस धमकावून धक्का दिला, फिर्यादी हा बाजूला झाला. सुरज हा तेथुन पळु लागला असता आरोपींनी पाठलाग करून सुरजचे गळयावर, पोटावर, चेहन्यावर वार करून त्यास जिवानीशी ठार केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे अजनी येथे पोउपनि गिरघुसे यांनी आरोपीविरूध्द करुम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.द.वि, सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी विपीनकुमार रामकुमार गुप्ता वय २२ वर्ष रा. बालाजी नगर, ताकसांडेचे घराजवळ, अजनी, नागपूर यास ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.