खापरखेडा :-पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत वार्ड क्र.१ जयभोले नगर खापरखेडा, दिनांक ०५/०६/२३ चे २१/३० वा ते २३ / ४५ वा यातील आरोपीनी स्वताचे आर्थिक फायदयाकरीता सुटका केलेल्या ०४ पिडीत मुलीला अधिक पैशाचे आमिश दाखवुन त्यांना यातील आरोपी नामे चंदाबाई हनुमान गुप्ता, अंजु हनुमान गुप्ता उर्फ अंजु तिलकचंद गुप्ता आर्यन अजय गुप्ता वय २२ वर्ष राहुल तिलकचंद गुप्ता दोन्ही रा जयभोलेनगर खापरखेडा यांना सदर ठिकाणी येण्यास सांगुन तेथेच देहव्यापारास जागा उपलब्ध करून देवून पिडीत मुलींना ग्राहकांस पुरवून कुंटनखाना चालवितांना मिळुन आले.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे सपोनी अजार कोटीराम नेवारे वय ५७ अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपी नामे १) क्षतिज संजय बन्सोड वय २० वर्ष २) फुलेश्वर जनक निर्मलकर वय २४ वर्ष ३) मोनू उर्फ एश्वर्य राजपाल बन्सोड वय २० वर्ष ४) प्रज्वल शालीक बन्सोड वय २१ वर्ष यांचे विरुद्ध कलम ३.४.५ अनैतीक व्यापार प्रतिबंध अधि १९५९ अन्वये गुन्हा नोंद, सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मकेश्वर पो स्टे कन्हान हे करीत आहे.