– गणेशोत्सव सजावट/ देखावे व सौंदर्यीकरण स्पर्धा
– फेसबुक लकी ड्रॉ द्वारे विजेत्यांची घोषणा
चंद्रपूर :- गणेशोत्सवादरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत त्रयस्थ परीक्षकांद्वारे करण्यात आलेल्या परीक्षणात आकाशवाणी येथील अथर्व गणेश मंडळास १ लाखांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी फेसबुक लाईव्हद्वारे सदर स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला.
स्पर्धेत दत्त नगर येथील श्री नवयुवक बाल गणेश मंडळास द्वितीय तर बाबुपेठ येथील नरसिंह बाल गणेश मंडळास तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले असुन ओम गणेश मंडळ भिवापूर वॉर्ड ,सार्वजनिक यंग गणेश मंडळ तीर्थरूप नगर,सार्वजनिक गणेश मंडळ सिव्हिल लाईन,मराठा चौक गणेश मंडळ बाबुपेठ,हिवरपुरी बाल गणेश मंडळ पठाणपुरा व श्री हनुमान नगर गणेश मंडळ यांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सदर स्पर्धा २ टप्यात घेण्यात आली होती यात एकुण ७० सार्वजनिक मंडळांनी नोंदणी केली होती यातील ३० मंडळांनी सक्रिय सहभाग दर्शविला होता. गणेशोत्सवादरम्यान करण्यात आलेली व उत्सवानंतर करण्यात मंडळ परिसरात करण्यात आलेल्या कामांना अनुक्रमे ४० टक्के व ६० टक्के गुणांवर परीक्षण करण्यात आले.
वृक्षारोपण,खत निर्मिती,सामाजिक सलोखा,टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू निर्मिती,किल्ले स्वच्छता शहराची सुंदरता, ध्वनिप्रदूषण,रेन वॉटर हार्वेस्टिंग अश्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या मुद्द्यांना अग्रस्थानी ठेवुन ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती व उत्सवाच्या माध्यमातुन पर्यावरणपुरक वातावरण निर्मिती करणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.