चोरी व वाहनचोरी करणाऱ्या आरोपीस अटक, ०२ गुन्हे उघडकीस

नागपूर :- पोलीस ठाणे गिटटीखदान हद्दीत सुमनताई वासनिक कॉलेजच्या पाठीमागे, दाभा, गिट्टीखदान येथे फिर्यादी मनोज महादेव बारसाकळे वय ३६ वर्ष रा. लॉट नं. १५ (ई), साईमंदीर जवळ, दाभा यांचा हेल्थ मशीनरीचा व्यवसाय असून बिल्डींगच्या पार्किंग मध्ये, त्यांचे परि इंटरप्रायजेस नावाचे हेल्थ मशीनरी पार्ट ठेवण्याचे कार्यालय आहे. फिर्यादी यांनी दिनांक १२.११.२०२३ रोजी लक्ष्मीपुजन करून १७.३० वा. पार्किंगचे गेट बंद केले, त्यानंतर दिनांक २०.११.२०२३ रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास फिर्यादी यांचेकडे काम करणारा मुलगा केशव शेषराव रागिट वय ३६ वर्ष रा, टेकडी वाडी, गिटटीखदान, नागपूर हा घटनास्थळी गेला असता काही लोखंडी मशीनरीचे पार्टस हे रोडवर पडलेले दिसले. त्याने गेटवरून आत जावुन पाहणी केली असता लोखंडी मशीनरीचे पार्टस दिसुन आले नाही. त्यांने फिर्यादी यांना फोन करून माहीती दिली. फिर्यादी यांनी घटनास्थळावर जावुन पाहणी केली असता एकुन ३,७७,२०५ रू चा मुददेमाल दिसुन आला नाही. कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे गिटटीखदान येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात गिट्टीखदान पोलीसांना पेट्रोलींग दरम्यान एक संशयीत इसम गणेशनगर, दाभा, पाण्याचे टंकीजवळील रोडने हातात एक पांढऱ्या रंगाची प्लास्टीक पिशवीत काहीतरी संशयीत घेवुन जातांना दिसुन आला. त्यास थांबवुन नाव विचारले असता त्याने हर्ष मुकेश उके वय २० वर्ष रा. पांढराबोडी, बौध्द विहार जवळ, अंबाड़ारी, नागपूर असे सांगितले. त्याने हातात असलेल्या पांढऱ्या रंगाचे प्लास्टीक पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये एक ग्रेन्डर ड्रिल मशीन व कॉईन ऐक्ससेप्टर ने एकुन १० नग मिळुन आले, त्याने ते सामान हे दाभा, सुमनताई वासनिक कॉलेजच्या पाठीमागे, एका बिल्डींगचे पार्किंग मधुन चोरी केल्याचे सांगितले. आरोपीची सखोल विचारपुस केली असता त्याने पोलीस ठाणे मानकापूर, नागपूर हददीतुन एक ऑरेंज रंगाची डियो मोपेड गाडी के. एम.एच. ३१ एफ.एच. ९३६९ हि सुध्दा चोरी केल्याचे सांगितले. आरोपीस अटक करून त्याचे ताब्यातुन दोन्ही गुन्हयातील चोरी केलेल्या मुददेमालापैकी एकुन ८८,१६० रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.

वरील कामगीरी पोलीस उप आयुक्त परि.क. ०२ नागपूर शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त सदर विभाग, नागपूर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश सागडे, विनोद रहांगडाले याचे मार्गदर्शनाखाली पोउपनि गोपाल राउत, पो. हवा. बलजीत ठाकुर, पो.ना. अजय यादव, इशांक आटे, पो.अ. आकाश लोथे, नागनाथ कोकरे यांनी केलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस अटक

Sat Nov 25 , 2023
नागपूर :-दिनांक १५.०४.२०२० ते दि. २३.०४.२०२३ दरम्यान पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत राहणारी ३० वर्षीय फिर्यादी हिची ओळख आरोपी मोहीत सुरेन्द्र शाहु वय २९ वर्ष रा. बेसा रोड, श्रीहरी नगर, याचे सोबत होवुन त्यांचे मध्ये मैत्री व प्रेम संबंध झाले, आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमीष दाखवुन तिला पोलीस ठाणे अजनी हद्दीत त्याचे दुकानात तसेच हॉटेल व फिर्यादीचे घरी मानकापूर येथे नेऊन तिचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com