भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोलीस ठाणे भिवापूर हद्दीत पेट्रोलीग व वाहतुक केसेस करीत असता, दिनांक ०९/०२/२०२४ रोजी सकाळी ०५.३० वा. दरम्यान गोपनीय सुत्रधाराकडून माहीती मिळाली की, भिसी ते उमरेड रोडवर १० चक्का टिप्पर क्र. MH-49/AT-7375 मध्ये अवैधरित्या विनापरवाना रेती (वाळु) टिप्परमध्ये लोड करून वाहतुक करीत आहे. अशा खात्रीशीर वातमीवरून भिसी ते उमरेड रोडवर अवैध रेती वाहतूक संबंधाने अचानक नाकाबंदी करून संशयीत टिप्पर क्र. MH-49/AT-7375 येतांना दिसला. त्याचा पाठलाग करून उकळी फाट्याजवळ थांबवुन पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे ०५ ब्रास रेती मिळुन आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले, सदरची रेती चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीच्या ताब्यातून टिप्पर क्र. MH-49/AT-7375 किंमती २५,००,०००/- रू. व त्यामध्ये ०५ ब्रास रेती किंमती २५,०००/-रु. असा एकुण २५,२५,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करून सदर टिप्पर क्र. एम. एच. ४९/८ टी- ७३७५ चा चालक आरोपी क्र. १) प्रदीप रंगलाल हटवार, वय ३४ वर्ष रा. आकोट त. पवनी जि. भंडारा, मालक नामे २) महेश तलमले रा. नागपुर यांचे विरूद्ध पोस्टे भिवापूर येथे कलम ३७९, १०९ भांदवि, सहकलम ४८ (७), ४८(८) महा. जमिन महसुल सं. सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे अधि. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पोस्टे भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपी क्र. ०१) यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोहार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग उमरेड, पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि, प्रमोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सदमेक, परी पोलीस उपनिरीक्षक किरण महागावे, सफी, नाकाडे, पोलीस अंमलदार सूरज हिवरकर, चापोशि सोरते यांचे पथकाने पार पाडली.