जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध कारवाई

मौदा :- अंतर्गत मौजा तारसा फाटा ता. मौदा येथे दिनांक ०९/०२/२०२४ चे ०५/५० वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील पोलीस पथक आपल्या स्टाफसह पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोवुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौदा पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन बोलेरो पिकअप क्र. MH-31/FC-5081 तसेच बोलेरो पिकअप क्र. MH-36/AA-3017 चे चालक (फरार) हे आपले ताब्यातील वरील दोन्ही बोलेरो पिकअप मध्ये प्रत्येकी पिकअप मध्ये प्रत्येकी १४ जनावरे एकुन २८ गोवंशीय जनावरे आखुड दोरखंडाने तोंड, मान, शिंगे, पाय वांधलेप्रेन्या स्थितीत अत्यंत निर्दयतेने कोंबुन त्यांची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने तसेच आपले ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन तारसा चौकातील रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्र. MH- 40/BL-6333 तसेच ट्रक क्र. MH-40/BL-1687 ला धडक मारून पळुन गेले. त्याचे ताब्यातून १) बोलेरो पिकअप क्र. MH-31/FC-5081 किंमती ८०००००/-रू. २) बोलेरो पिकअप क्र. MH 36/AA-3017 किंमती ८०००००/- रू ३) दोन्ही वाहनामधील एकुण २८ जनावरे किंमती २,८०,०००/- चे असा एकूण १८,८०,०००/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीतांविरूद्ध पोस्टे मौदा येथे अप क्र. ११६/२४ कलम ११(१) (ड) (प) (घ) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० सहकलम ५(अ) (१) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम २७९ भा. द. वी सहकलम १८४ मो.वा.का. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोहार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, पोलीस स्टेशन मौदा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीषसींह राजपुत, पोलीस हवालदार संदीप कडू, गणेश मुदमाळी, रूपेश महादुले, पोलीस नायक दिपक्क दरोडे, पोलीस अंमलदार अतुल निंबरते यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार्यवाही

Sat Feb 10 , 2024
मौदा :- मौदा पोलीसांचे पथक पोस्टे हटीत पेट्रोलींग करीत असताना माहीती मिळाली की, एक इसम ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने रेती भरुन चोरटी वाहतूक करीत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनीय माहीती वरून मौदा पोलीसांनी नाकाबंदी केली असता मौजा आजनगाव शिवार, ता. मौदा येथे एक सिल्व्हर रंगाचा क्रमांक नसलेला आयसर कंपनीचा ट्रॅक्टर व एक लाल रंगाची विना क्रमाकाची ट्रॉली मध्ये आरोपी नामे- पवन अर्जुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com