रेती चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

भिवापूर :- अंतर्गत १०० मी. अंतरावरील पो स्टे भिवापुर टी पॉईन्ट येथे दिनांक ०६/०५/२०२३ चे ०५/४५ वा. ते ०६/१५ वा. दरम्यान टिप्पर वाहन क्र. MH-40-BG-8557 चा चालक आरोपी नामे – रोशन बंडू नारनवरे वय २९ वर्ष, य हळदगाव ता. उमरेड जि. नागपुर याने त्याच्या ताब्यातील वाहनामध्ये अवैधरित्या विना परवाना ६ ग्रास रेती किंमती ३०,००० (तीस हजार) रु. भरून वाहतुक करतांना मिळुन आले. १० चाकी टिप्पर वाहन क. MH-40-BG-8557 किंमती २०,००,००० (वीस लाख रूपये असा एकुण वाहनासह २०,३०,०००/- रूपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरतर्फे पो.नि. जयपालसिंह गिरासे नेमणुक पोस्टे. भिवापुर यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास पोना / १४७ अनिल कोकोडे पो स्टे भिवापुर हे करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com