नागपूर – पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट न. १९७, आराधना नगर, शेख किराणा आटा चक्की जवळ राहणारे फिर्यादी शेख रशीद शेख बशीर वय ५० वर्ष यांनी त्यांचा ई रिक्षा क्र. एम.एच ४९ बी.एम ६६२१ किमती अंदाजे ७०,०००/- रु ची विक्री करीता काढली असता आरोपी याने ई रिक्षाची ट्रायल घेण्याचे बहाण्याने घेवुन गेला व परत आला नाही. फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस ठाणे वाठोडा येथे कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होत.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखेचे वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत व तांत्रीक माध्यमातुन तपास करुन ई रिक्षा चोरुन नेणाऱ्या आरोपीची ओळख पटवुन आरोपी नामे वासुदेव रघुजी रामटेककर वय ३७ वर्ष रा. हनुमान सोसायटी, मेहंदीबाग, पाचपावली यास नमुद गुन्हयात अटक केली आरोपीची सखोल विचारपूस केली असता आरोपीने पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतुन एक हिरव्या रंगाची ई रिक्षा किमती अंदाजे ६०,०००/- रू चोरी केल्याची तसेच पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील फसवणुकीचे गुन्हयातील हिरव्या रंगाची ई रिक्षा किमती अंदाजे ५०,०००/- रू ची चोरी व फसवणुक करून नेल्याचे कबुली दिली. आरोपी कडुन एकुण ३ गुन्हे उघडकीस आणले असुन त्यांचे ताब्यातुन एकुण ०३ ई रिक्षा किमती १,८०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई सुदर्शन मुमक्का, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन), संजय जाधव, प्रभारी सहायक पोलीस आयुक्त, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अनिल इंगोले, बलराम झाडोकर, पोहवा. दिपक रिठे, नापोशि विलास कोकाटे, पंकज हेडाऊ, पो.शि. कपीलकुमार तांडेकर, राहुल कुसरामे, अभय ढोणे यांनी केली..