भालेराव महाविद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

सावनेर :- स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात “आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थी कल्याण योजना” अंतर्गत नुकतेच एका कार्यक्रमाद्वारे गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पराग निमिशे होते तसेच आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. मिलिंद बरबटे तर योजना प्रभारी प्रा. डॉ. विलास डोईफोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

महाविद्यालय सदर योजना विद्यार्थ्यांमध्ये सहकार्यांची भावना निर्माण व्हावी, समान संधी मिळावी या उद्देशाने मागील पंधरा वर्षांपासून राबवित असून आतापावेतो तीनशेच्यावर विद्यार्थ्यांना मदत करण्यात आल्याची माहिती प्रा. डोईफोडे यांनी प्रस्ताविकात दिली. सदर कार्यक्रमात पंचेवीस विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उद्देशांसाठी आर्थिक मदत करण्यात आली. या योजनेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी स्वयमस्फूर्तीने निधी गोळा करतात. ही योजना महाविद्यालय स्वयं निर्मित असून भविष्यात सर्वांनी सढळ हाताने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मदत करण्याचे प्रा. बरबटे यांनी आवाहन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलतांना आर्थिक साक्षरता, नवीन शैक्षणिक धोरण आणि नोकरी संधी यावर प्राचार्य निमिशे यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वर्ग प्रतिनिधी चैतन्य सुपारे, धनश्री लेकूरवाळे, साक्षी कुरळकर, मोनाली भोयर, कल्याणी निंबाळकर, खुशबू सोनी, उत्कर्षां साबळे, गायत्री नवघरे, माधुरी मारोतकर, हिमांशू बोबडे, नेहा धाडसे, मानसी बागडे यांचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कट-आऊट्स लावण्यापेक्षा लोकांची मने जिंका - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Sun Mar 17 , 2024
– दक्षिण नागपूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा संमेलन नागपूर :- कट-आऊट्स आणि पोस्टर्स लावून सर्वसामान्य लोकांची मने जिंकता येत नाहीत. त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण गेल्या दहा वर्षांत केलेली कामे सांगावी लागतील आणि त्याचवेळी विकासाचा ‘पिक्चर अभी बाकी है’ हेही त्यांना सांगावे लागेल, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) युवा कार्यकर्त्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com