कोळसा चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई

कन्हान :- अंतर्गत ०४ किमी अंतरावर टेकाडी रोड कन्हान ता. पारशिवनी येथे दिनांक १५/०२/२०२४ चे ०९.०० वा. ते ०९.१५ वा. दरम्यान फिर्यादी नामे संतोश इंद्रसींग यादव, वय ३८ रा. कामठी कॉलरी क्वा. नं. ५२७ कन्हान हा दि. १५/०२/२४ रोजी ८ ते ४ डयुटीवर हजर असता तेव्हा सकाळी ९.०० वा. दरम्यान माहिती पडले की डब्ल्यूसीएल येथी कोळसा चोरून घेउन जात आहे. म्हणून फिर्यादी एमएसएफचे डयुटीवर हजर असलेले जवान यांना इंदर खदानचे मागे टेकाडी रोडवर जावुन पाहीले असता दोन मोसा चालक १) मोसा क्र. एम. एच.- ४०/ बी.- १९७८ चा चालक आरोपी नामे १) सुनिल धनपत कश्यप, रा. खदान नं. ६ ने ३ बोरी कोळसा व २) मासो क. एमएच ४० एम ११९९ बालक आरोपी नामे २) चालक अक्षय महेंद्र नागदेवे रा. गोंडेगाव हे आपल्या वाहनाने ३ बोरी कोळसा असा एकुण ६ बाकरी कोळसा वजन अंदाजे ४८० किलो किंमती ४८००/- रूपये वा पेठन जातांनी मिळुन आले तसेच दोन्ही मोटर सायकलची कि. प्रत्येकी १००००/- रू. प्रमाणे असे एकुण २००००/- रू. दोन्ही एकुण किंमती २४८००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कन्हान येथे आरोपीतांविरुध्द कलम ३७९, ३४ भादंवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा जयलाल सहारे, मो. नं. ९३०९९६६३९२ हे करीत आहे. यातील आरोपीतांना सुचनापत्रावर सोडण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कन्हान येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोहवा जयलाल सहारे, पोशि कोमल खैरे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर (ग्रामीण) पोलीसांची अवैधरीत्या दारु विक्रेत्यांवर कारवाई

Sat Feb 17 , 2024
नागपूर :- संपूर्ण नागपूर (ग्रामीण) जिल्हयातील पोलीस स्टेशन निहाय अवैधरीत्या दारु विकीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा नागपूर (ग्रामीण), पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी घेतला असता यामध्ये एकूण दिनांक १५/०२/२०२४ रोजी एकूण १० केसेस अवैधरीत्या दारुची विक्री करणाऱ्या गुन्हेगारां विरुध्द दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण १० आरोपीतांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात आतापर्यंत ७०७०/- रु. वा माल जप्त करुन १२९६० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com