नागपूर :- कुही हद्दीत कुही फाटा राजु ढाबा येथे दि. ११/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी विजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे हा दिड ते दोन महीण्या पासुन राजु हेंगरे यांच्या ढाबावर भांडे धुण्याचे काम करीत असे व तेथे जेवन करून राहत असे व फिर्यादी सोबत आरोपी मंडला उर्फ छोटु वय ३५ ते ३६ वर्ष हा ढाब्यावर पोळया करण्याचे व वेटर चे काम करत असे. आरोपी वय २८ ते २९ वर्ष हा वेटरचे काम करत असे. तसेच जामकर नावाची महीला ही पोळी बनवायचे काम करीत असे. दि. २१/११/२०२३ रात्री ०९.०० वा. दरम्याण राजु ढंगरे यांनी जामकर या महीलेला तिच्या घरी सोडुन धाब्यावर ०१.३० वा आपल्या कारने परत आले तेव्हा आरोपींनी कामाच्या पैशाची मागणी केली असता मृतक नामे- राजु भाउराव हेंगरे वय ४८ वर्ष रा. उंद्री ता. उमरेड जि. नागपुर हा दोन तिन दिवसात पैसे देतो असे म्हणाले असता आरोपी व मृतकात बाचाबाची झाली. मृतक हा आरोपीच्या खाटेवर जावुन झोपुन गेला. व आरोपी सुच्दा बाजुला जावुन झोपुन गेले. अंदाजे ०२.३० वा दरम्याण भांडे पडण्याच्या व मृतकाचा आवाज येत होता जावुन पाहले असता मंडला आणि आदि हा राजु ढंगरे यांना गळ्यात लंबी पट्टी बांधुन खिचत होते. त्या नंतर मंडलाने मृतकाला हातातील लाकडाने व चाकु सारख्या हत्याराने त्याच्या तोंडावर मारले व आदिने लाकडाने त्यांच्या डोक्यावर मारले व ते राजु ढंगरे यांना खाटेवर लेटवून त्यांच्या तोंडावर झाकुन राजु ढेंगरे यांची कार घेवुन तेथून निघून गेले. काही वेळानी त्यांचे गावातील नातेवाईक आले असता राजु ढंगरे हे मरण पावले होते. धावा मालकाचा खून करून मृतकाची अल्टो कार घेवून पळत असताना विहीरगाव शिवारात डीवायडरला धडकुन पलटी झाली त्यात दोन्ही आरोपी हे जखमी अवस्थेत फरार झाले. फिर्यादीच्या रोपोर्ट वरून फरार आरोपीविरुध्द पो.स्टे. कुही गुन्हे रजि.नं. ७२०/२०२३ कलम ३०२, ३४ भादवि अन्वये खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री ए. पोहार (भा.पो.से.) यांनी पोलीस स्टेशन कुही येथील पथक व स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ०३ विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. दिनांक १३/११/२०२३ रोजी सदर खुनाच्या गुन्हयाचे समांतर तपासा दरम्यान वरिष्ठांनि दिलेल्या आदेशानुसार
सदर गुन्हा अत्यंत गुंतागुंतिचा असल्याने व गुन्हयातील आरोपीची काहीही ओळख नसल्याने तसेच मृतक हा राजकीय पार्श्वभूमीचा असल्याने गुन्हा उघडकीस यावा या करिता आरोपींचा लोकल cctv फुटेज, रेल्वे स्थानक परिसर, कॉटन मार्केट, एम पी बस स्टॉप नागपूर इत्यादी ठिकाणी शोध घेऊन मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे तसेच तांत्रिक तपासा दरम्यान फरार आरोपी इसम नामे १) विशेष कुमार रामदास रघुवंशी वय ३३ रा. कोडवन मडला मध्यप्रदेश २) आदी चंद्रामनी नायक, वय ३० वर्ष, रा. बनपल्ली ओडीसा यांना त्यांचे राहते गाव मंडला मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी आपल्या केलेल्या गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करून पोस्टे कुही यांच्या ताब्यात दिले. सदर गुन्हयाचा तपास कौशल्य पूर्वक करून अवघ्या ७२ तासाचे आत उचडकीस आणला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने मा. सहायक पोलीस अधीक्षक आशित कांबळे हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भा.पो.से) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग राजा पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस स्टेशन कुही येथील प्रभारी ठाणेदार निवेश डोलीकर, पोस्टे उमरेडचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, आशिष ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखाडे, बटुकलाल पांडे, विशेष तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास तुमके, पोलीस हवालदार, अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मयूर केकले, विनोद काळे, इक्बाल शेख, पौशी राकेश तालेवार, नापोशी मनीष भुते चापशी आशुतोष लांजेवार, सुमित बांगडे व विशेष तांत्रिक मदत पोशी मृणाल राऊत यांनी पार पाडली.