जबरी चोरी करणारे आरोपी गजाआड

– पोलीस स्टेशन कळमेश्वरची कार्यवाही

कळमेश्वर :- पोस्टे कळमेश्वर हद्दीत १५ किमी अंतरावर कोळी मोहळी शिवार कळमेश्वर येथे दिनांक १२ / ११ / २०२३ चे रात्री ०२.०० वा. ते ०२.३० वा. दरम्यान फिर्यादी गोपीचन्द्र बनवारीलाल गौतम व त्याचे मित्र हे रूममध्ये हजर असता यातील अनोळखी आरोपीतांनी फिर्यादी व त्याच्या साथीदाराला रूम मध्ये बंद करून त्यांना टिकास व सबलचा धाक दाखवून  रेल्वेचा स्क्रॉप माल तसेच फिर्यादी व त्याचे साथीदाराचे ०७ अँन्डरोइड मोबाईल फोन किंमती अंदाजे ४९०००/- रुपये असा एकुण १,०४,०००/- रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे फिर्यादी यांच्या रोपोर्ट वरून पोस्टे कळमेश्वर येथे ०४ अनोळखी आरोपींविरुध्द अप क्र. ९७५/२३ कलम ३९२ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील तपास पथक करीत असता घटनास्थळावरून खापरी येथील केने येथील ग्रामपंचायत सीसीटीवी फुटेज चेक केले असता सदरचे वाहने हे कळमेश्वरकडे बायपास रोडनी जातांनी दिसुन आल्याने सेलु टोल नाका येथील पुन्हा सीसीटीव्ही फुटेज चेक करून पाहीले असता आरोपातांनी गुन्हयात वापरलेले वाहन है दिसुन आले. सदर टाटा योद्धा पिकअप वाहन एम. एवं ३७ / टी-२०७२, ही खरी नंबर प्लेट काढून सदर गाडीचा नंबर एम. एच-३७ / टी- ६५६९ ही बनावटी नंबर प्लेट तयार करून प्लेटची वाहन अॅपवर माहिती काढली असता ते वाहन मोपेड वाहनाचे दाखविल्यावरून सदर वाहनास लागलेल्या फास्ट टॅगची माहिती काढली असता ते वाहन कारंजा वाशिम येथे दाखवत असल्याने तपास पथक हे कारंजा वाशिम येथे रवाना होवुन मुळ मालकास विचारपुस करून त्यांनी सांगतिले की, मी सदरचे वाहन हे चंद्रपूर येथील मो. फिरोज अब्दुल वाहग यास विकल्याचे सांगतिल्यावरून सदर पत्त्यावर तपास पथक हे रवाना होवुन शोध घेतला असता मो. मो. फिरोज अब्दुल वाह हा मिळून आल्याने त्यास ताब्यात सेवुन गुन्हयाच्या अनुशंगाने सखोल विचारपुस केली असता त्याचे सोबत आरोपी क्र. १) संतोष राजकुमार राय, वय १९ रा. घुग्गुस जि. चंद्रपूर २) करण अर्जुन नाईक, वय २३ रा. घुग्युस जि. चंद्रपूर यांना ताब्यात मेवुन तसेच गुन्हयात वापरलेले वाहन एम. एच-३७ / टी-२०७१ किमती अंदाजे ५,५०,०००/- रू डीटेन करून पोस्टेला हजर येवुन नमुद आरोपीतास गुन्हयाच्या अनुशंगाने विचारपुस करणे सुरू आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पोटभरे हे करीत आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोदार (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, अजय चांदखेडे, पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील ठाणेदार यशवंत सोलसे, सहायक पोलीस निरीक्षक  दिलीप पोटभरे, सहायक फौजदार मन्नान नौरंगाबादे, पोलीस हवालदार  पंकज गाडगे, संजय वानखेडे, पोलीस अंमलदार राणा ठाकूर यांनी पार पाडली.

NewsToday24x7

Next Post

सराईत गुन्हेगार विशाल नरबद कनोजे याला MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षाकरीता केले स्थानबध्द

Wed Nov 15 , 2023
– (स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई) नागपूर :-पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येणाऱ्या सिरसोली परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल नरबद कनोजे, वय ४२ वर्ष, रा. सिरसोली हा मागील ०३ वर्षापासून अरोली परिसरात गुंडगिरी करून नागरिकांना त्रास देत होता. तो नेहमी गुन्हेगारी कृत्यात गुंतलेला असायचा अरोली परिसरात मोहाफुलाची हातभट्टीने दारू काढुन विक्री करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असामाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणान्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com