नागपूर :- दिनांक ०९.०६.२०२३ वे ०४.०० वा च्या सुमारास पो. ठाणे सक्करदरा हद्दीत आझाद कॉलोनी, दलवाले अम्मा दर्गाजवळ, सक्करदरा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहम्मद रिजवान उर्फ रिज्जू सैय्यद वल्द युसूफ सैय्यद वय २३ वर्ष हे मेला ग्राउंड मोठा ताजबाग दर्गाह समोर हजेरीसाठी बसले असता आरोपी सोनू खान उर्फ शाकीब खान बल्द महबुब खान वय २८ वर्ष रा यासिन प्लॉट, मोठा ताजबाग, नागपूर याने फिर्यादी जवळील विवो कंपनीचा मोबाईल व फिर्यादीचे खिश्यातील १,५००/- रू जबरदस्तीने हिसकावून घेतले. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना दरबाराचे सुरक्षा रक्षकाने त्यास अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने खिश्यातून चाकू काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. या मध्ये मोबाईल जागीच पडला व आरोपी १,५००/- घेवुन पळून गेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे पोउपनि गरे यांनी आरोपीविरूद कलम ३९२, भा.दं. वो सहकलम ४/२५ मा.ह.का अन्वये गुन्हा नोंद केला सदर गुन्हयाचे तपासात पोउपनि सावरकर व तपास पथकाचे अंमलदार यांनी गुप्त बातमीदराचे माहितीवरून आरोपीस ताजबाग मेला ग्राउंड येथून ताब्यात घेवून अटक केले आहे. पुढील तपास करीत आहे.