उमरेड :- दिनांक ०३/०३/२०२३ ते दिनांक १९/१२/२०२३ चे १०.०० वा. ते ०१.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी हिचे प्रेम प्रकरण आरोपी नामे- रोशन फुलचंद चव्हाण, वय २१ वर्ष, रा. नाड याचे सोबत सुरू असल्याने ते एकमेकांना चांगले ओळखत होते. दिनांक ०१/०१/२०२३ रोजी फिर्यादी ही शेतात जात असतांना फिर्यादीला थांबवुन फिर्यादीशी बोलायचे आहे असे म्हणून फिर्यादीला त्यांनी आपल्या शेतात घेवुन गेला व आपण दोघे ही लग्न करू असे म्हणुन फिर्यादी सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापीत केले तसेच १९/१२/२०२३ रोजी रात्री ०१/०० वा. दरम्यान सोनवा नगर दल्लवाडी नागपुर येथे नेवुन फिर्यादी सोबत शारीरीक संबंध केले आणि घरी कोणालाही काहीही सांगितले तर तुला मारून टाकिन अशी धमकी दिली फिर्यादी घाबरल्याने कुणालाही काहीही सांगितले नाही, परंतु दिनांक २२/१२/२०२३ रोजी सकाळी १०/०० वा. सुमारास आरोपीने फिर्यादीला बेसुर बसस्टॉपवर बोलाविल्याने फिर्यादी घरून गेली असता परत घरी आल्याने फिर्यादीच्या वडीलांनी विचारल्याने त्यांना पडलेली सर्व हकिकत सांगितली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुध्द कलम ३७६, ३७६ (२) (n). ३७६ (२) (j), ३७६ (२) (क) ३७६ (३) भादंवी ४, ६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुचिता मंडवाले या करीत आहे.