गादा गावात ई-रिक्षा उलटल्याने ई रिक्षाचालकाचा जागीच मृत्यु..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 21:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गाव मार्गे लिहिगाव कडे यात्री प्रवास करीत असलेल्या ई रिक्षाचालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने परिणामी ई रिक्षा उलटल्याने घडलेल्या गंभीर अपघातात ई रिक्षाचालकाचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी सात दरम्यान घडली असून मृतक रिक्षाचालकाचे नाव दुर्गाप्रसाद प्रभाकर देशमुख वय 44 वर्ष रा बहादुरा फाटा ,वाठोडा नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक रिक्षाचालक हा आपल्या तीनचाकी ई रिक्षा क्र एम एच 49 बी एम 4462 ने आजनी येथून लिहिगाव कडे गादा गाव मार्गे यात्री प्रवास करीत असताना गादा गावाजवळ रिक्षाचालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ई रिक्षा ऊलटी झाल्याने घडलेल्या गंभीर अपघातात ई रिक्षा चालकाचा जागीच मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरिय तपासणीसाठी मृतदेह कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविले असून पुढील तपास सुरू आहे.

Next Post

भल्या पहाटे मुख्यमंत्र्यांकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी

Tue Nov 21 , 2023
– मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना – नागरिकांनी स्वच्छतेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई :- शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वाढविण्याची सूचना त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना यावेळी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com