वाडी :- पोलीस ठाणे वाडी हद्दीत राहणारी १६ वर्षीय फिर्यादी / पिडीता हि आपले घरी एकटी असतांना त्यांचे वस्तीत राहणारे यांचा नातेवाईक आरोपी शैलेष ईश्वरदयाल चौधरी वय २१ वर्ष रा. सुकडी टेकडी, ता. कटंगी, जि. बालाघाट, म.प्र याने फिर्यादी सोबत ओळखीचा व तिचे अल्पवयीन असल्याचा फायदा घेवून तिला लग्न करण्याचे आमीष दाखवून तिचे सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. पिडीतेला त्रास झाल्याने ती आई सोबत डॉक्टरकडे गेली असता पिडीता गर्भवती असल्याचे समजले. याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे पोउपनि नाचन यांनी आरोपीविरुध्द कलम ३७६ (२) (एफ) (जे), भा.दं.वि. सहकलम ४, ६, ८, १० पोक्सो कायदान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे