संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाशिवरात्री पर्वाचे औचित्य साधून कामठी तालुक्यातील आदर्शगाव ख्यातिप्राप्त कढोली गावात ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण करारे यांच्या पुढाकारातून व गावकरी मंडळींच्या सहभागातून कढोली गावातील मुक्ती धाम घाट स्मूर्ती उद्यान परिसरात भगवान शिवशंकर यांची मूर्ती स्थापना करण्यात आली.
याप्रसंगी यज्ञाचार्य आचार्य संतोष महाराज, यजमान सरपंच लक्ष्मण करारे,पुष्पां करारे,मोरेश्वर ठाकरे,चेतना ठाकरे,भोजराज घुले,किर्ती घुले, लक्ष्मण ठाकरे, नंदिनी ठाकरे, दत्तूजी गावंडे, देवेन्द्र गावंडे,नमिता गावंडे,चिंतामण करारे,सिंधु करारे,प्रवीण ठाकरे, मीनाक्षी ठाकरे,ग्रामपंचायत सचिव श्याम उंचेकर, सोनालि उंचेकर यासह समस्त गावकरीगण उपस्थित होते.