नागपूर :- पोलीस ठाणे वाडी हद्दीत, प्लॉट नं. १०, ११, कंट्रोलवाडी, वेलट्रिट हॉस्पीटल मागे, नागपुर येथे फिर्यादी निर्मल राजकुमार मिरानी, वय ४१ वर्षे, रा. प्लॉट नं. २५, चावला चौक, जरीपटका, नागपूर यांचे प्रिती ट्रेडर्स नावाचे ईलेक्ट्रीक सामान विक्रीचे गोडवुन आहे. गोडावुन बंद करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे गोडावुनचे शटर वाक्युन आत प्रवेश करून ड्राव्हर मधील रोख १,२२,०१०/- रू. चोरून नेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात वाडी पोलीसांनी तांत्रीक तपास करून सापळा रचुन आरोपी १) प्रशांत दिनेश साखरे वय १९ वर्षे, २) विलास उर्फ ईल्ला सुभाष चौधरी वय २५ वर्ष ३) निखील उमेश मलये वय १९ वर्ष ४) निखील उर्फ कल्या दिनेश नेवारे वय १९ वर्ष सर्वे रा. वार्ड क. २, सुरावर्दी वस्ती, वाडी, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपींनी नमुद गोडावुन मधुन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन रोख ३५,१००/-रु., व गुन्हयात वापरलेली लाल रंगाची प्लेहार गाडी एम. एच ३६ एम १२६६ किंमती अंदाजे ४०,०००/- रू की चोरीच्या पैश्यातुन खारेदी केलेले तिन मोबाईल किंमती २३,४९९/- रू व आरोपोंचे दोन मोबाईल व लोखंडी टिकास असा एकुण १,१९,०९९/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त (परि. क. १), सहा. पोलीस आयुक्त (एम.आय.डी.सी विभाग) यांने मार्गदर्शनाखाली, वयोनि, राजेश तटकरे, पोउपनि, कुणाल धुरट, पोहवा. प्रमोद गिरी, नापोअं. प्रविण फलके, हेमराज केराड, पोअं, प्रमोद सोनोने व सतिश येसनकर यांनी केली.