सिकलसेल हा एक जेनेटिक, अनुवांशिक आजार आहे- डॉ नयना धुमाळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 19 :-सिकलसेल आजारामध्ये असामान्य हिमोग्लोबिन मुळे लाल रक्त पेशींचा आकार बदलतो या रक्तपेशींच्या बदलाला सिकलिंग असे म्हणतात तर सिकलसेल हा एक जेनेटिक व अनुवांशिक आजार असल्याचे मौलिक प्रतिपादन शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ नयना धुमाळे ह्या आज 19 जून जागतिक सिकलसेल दिनानिमित्त शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आयोजित सिकलसेल तपासणी कार्यक्रमात व्यक्त केले.
तसेच सिकलसेल रुग्णाकरिता इतर शासकीय सुविधा असुन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1000 रुपयांची मदत, महात्मा फुले जिवनदायो योजनेचा लाभ, सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्यााावेळी प्रति तास 20 मिनिटे अतिरिक्त वेळ, महाविद्यालयीन तसेच बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी लेखनिकाची मदत , उपचारादरम्यान सिकलसेल रुग्ण व त्याच्या एका मदतनीसास मोफत एसटी प्रवास अशा सुविधा असल्याचे माहिती डॉ अली यांनी सांगितले .यावेळी शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच गुमथी व गुमथळा या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा जागतिक सिकलसेल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सिकलसेल रक्त तपासणी करून सिकलसेल रुग्णांना सिकलसेल ओळखपत्र सुद्धा वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ अली, डॉ प्रशांत डंभारे,डॉ वंजारी,दिलीप अडगूळकर, डॉ अरुण नागरे , देवेंद्र फुलझेले यासह आदींनी उपस्थिती दर्शवून विशेष वैद्यकीय सेवा पूरविली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमतीने बळीराजा चिंतेत

Sun Jun 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी –शेती करावी तरी कशी कामठी ता प्र 19:- इंधन दरवाढी पाठोपाठ खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे.अगोदरच महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर खतांच्या दरवाढीचा बोजा वाढला आहे.अनिश्चित पाऊस,मजुरांचे वाढलेले दर, दरवर्षी रासायनिक खतांचे वाढलेले दर यामुळे शेती पीक नफा तोट्याचे म्हणजेच आर्थिक गणित चांगलेच कोलमडले आहे त्यातच पुन्हा एकदा रासायनिक खतांच्या किमती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights