नागपूर :- वीजचोरी तपासणी मोहीमेदरम्यान महावितरण अभियंता आणि कर्मचा-यांना मारहाण आणि शिविगाळ करणा-या पज्जू आणि मोहम्मद मुस्तफा मुझफ्फर अली या दोन आरोपींना तहसिल पोलीसांनी अटक केली आहे.
22 ऑगस्ट रोजी दुपारी 3.15 च्या सुमारास हैदरी रोड, मोमीनपुरा भागात महावितरणच्या वीजचोरी तपासणी मोहीमेदरम्यान पंजू नावाच्या व्यक्तीने वीज चोरी विरोधी पथकातील सहायक अभियंता निखिलकुमार नायक व सहका-यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिली, याशिवाय आजूबाजूच्या लोकांना एकत्र करून या पथकाला घेराव घातला आणि यांना तर त्यानंतर मोहम्मद मुस्तफा मुझफ्फर अली या व्यक्तिने ईतवारी उपविभागात कार्यरत सहायक अभियंता सुबोध मंडपे यांचा हात मुरगाळून पंचनाम्याचे कागदपत्रे हिसकावित शिवीगाळ, धक्काबुक्की करीत मारण्याची धमकी दिली. यावेळि तेथे असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे तेथील महावितरणच्या कर्मचा-यांना बाहेर काढता आले. शासकीय कामात अडथळा आणून वीज चोरी पकडण्यास मज्जाव करीत वीज चोरी विरोधी मोहीम थांबविल्या प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 126(2), 115,352,351,(2),3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अधारे तहसिल पोलीसांनी पज्जू आणि मोहम्मद मुस्तफा मुझफ्फर अली या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.