संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड गावातील फॉर्महाऊस वरील चौकीदाराने शेजारच्या शेतावरील शेतकरी दाम्पत्याच्या 9 वर्षोय मुलगी व पुतणी वर विनयभंग करून अत्याचार केल्याची घृणास्पद घटना नुकतीच उघडकीस आली असून यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून या नराधम आरोपी मोहन रुपरावजी वानखेडे वय 58 वर्षे रा मूळचा सुरगाव , वर्धा विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर नराधम आरोपी हा मूळचा वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगावचा रहिवासी आहे.त्याची पत्नी व मुले सुरगावलाच राहतात तर आरोपी हा कामठी तालुक्यातील घोरपड गावातील एका फॉर्महाऊस वर चौकीदार म्हणून कार्यरत होता.या फॉर्महाऊस च्या बाजूला असलेल्या शेतकरी पती पत्नी हे आपल्या 9 वर्षोय मुलगी व पुतणी ला झोपडीत वास्तव्यास ठेवून शेतीकामाला गेले असता सदर आरोपी चौकीदार हा मधुर संबंधातुन या अल्पवयीन मुलीशी खेळता खेळता विनयभंग करून अत्याचार करीत होता तर याबाबत कुणाला वाछत्या केल्यास जीव घेणार अशी भीती दाखवून अल्पवयीन पीडितांना धमकावत होता.हा प्रकार आरोपीचा 30 मे 2022 ते 30 जून 2022 पर्यंत सतत सुरू होता.दरम्यान शेतातून परतलेल्या एका मुलाला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला एकच धक्का बसला याबाबत त्याने पीडित मुलीच्या आई वडिलांना माहिती दिल्यावर पीडित आई वडिलांनी आरोपीच्या कृत्याचा भंडाफोड करून थेट पोलीस स्टेशन गाठून गुन्हा नोंदविला.पोलिसांनी आरोपीला अटक केला असून 5 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत आहे.तर पुढील तपास कामठी चे सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आलूरकर करीत आहेत.
शेतकऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस 5 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com