नागपूर :- कळमणा पोलीसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असता त्यांना गुप्त बातमीदारांने दिलेल्या खात्रीशीर माहिती वरून कळमणा हद्दीत भरतवाडा, वाय पॉईन्ट, नाल्या जवळील जागेत अंधारात धाड टाकली असता, संगणमत करून दरोडा घालण्याचे तयारीत असलेले आरोपी क्र. १) मुस्तकीन खान करीम खान वय ३५ वर्ष रा. प्लॉट न. ११२. पार्वती नगर, कळमणा वस्ती २) टिपू सुलतान अशपाक शेख वय २१ वर्ष ग. गल्ली न. १३, आदिवासी प्रकाश नगर, ३) अंकीत चंदन बागडे वय २१ वर्ष रा. राहुल गांधी नगर, चिखली झोपडपट्टी, ४) सतीश उर्फ दादु रामाजी वाघमारे वय २७ वर्ष रा. शिवनकर नगर झोपडपट्टी, खरबी रोड हे समक्ष मिळुन आले. व त्यांचा साथिदार आरोपी हा अंधाराचा फायदा येवून पळून गेला. आरोपांचे ताब्यातून एक लोखंडी चाकु, एक लोखंडी रॉड, दोरी, मिर्ची पावडर पॅकेट असा एकूण किमती अंदाजे ४०० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस ठाणे कळमणा येथे सफ अजय गर्जे यांनी दिलेल्या रिपोर्टवरून सपोनि शिंदे यांनी आरोपीविरुद्ध कलम ३९९ ४०२ भा.दं.वी. सहकलम ४/२५ मा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्ह नोंदवून आरोपी क. १ ते ४ यांना अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे..