नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ पोलीसांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना, पोलीस ठाणे नंदनवन हहीत, पडोळे नगर येथे राहणारा शिलवंत सोनटक्के याचे जवळ अग्नीशख असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पंचासमक्ष पडोळे नगर, माजी नगरसेवक मेश्राम यांचे वरा समोर राहणारा शिलवंत भगवान सोनटक्के वय ३७ वर्ष याचे घराची झडती घेतली असता घरामधील एका जुन्या बॅगमध्ये एक प्राणघातक अग्नीशस्त्र व स्टीलची मॅगझीन व दोन जिवंत काडतुस मिळुन आले. आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन मोबाईसह वरील मुद्देमाल किंमती एकुण अंदाजे ८१,२००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीने मनाई आदेशाचे उल्लंघन करून घातक अग्नीशस्त्र बाळगतांना समक्ष मिळुन आल्याने त्याचे विरूध्द पोलीस ठाणे नंदनवन येथे पोहवा. राजेन्द्र टाकळीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम ३/२५ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. आरोपीस पुढील कारवाईस्तव नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी राहुल माकणीकर पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. राहुल शिरे, पोउपनि, राजेश लोही, पोहवा. राजेन्द्र टाकळीकर, नापोनं, प्रविण भगत, गणेश ठाकरे, योगेश महाजन, पोअं. विशाल नागभिडे, अमोल भक्ते व मपोहवा. संगीता निखाडे यांनी केली.