अहमदनगर जिल्ह्यातील कांद्याला रास्त भावाबाबत  व लाल कांदा खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश खासदार सदाशिव‍राव लोखंडे यांची माहिती

नवी दिल्ली :- नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथे कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजारभाव, अहमदनगर जिल्ह्यालाही मिळण्याबाबत तसेच शिर्डी, अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव‍राव लोखंडे यांनी दिली.

खासदार लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते. लोखडे यांनी मंत्री गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली. नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे जिल्ह्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातही भाव मिळण्याकरिता संबंधीतांना आदेश देण्याची विनंती केली.

अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याची व केद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी हटवून त्याची निर्यात लवकर सुरु करण्याचीही मागणी केली. सोबतच तातडीने केंद्र शासनाकडून नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदी करुन चांगला भाव देण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

Wed Dec 13 , 2023
मुंबई :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी दिनांक ०८ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत एस.एस.बी.(SSB) कोर्स क्र. ५६ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!