सन 2020, 2021 व 2022 चे कृषी पुरस्कार जाहीर

– राज्यातील शेतीनिष्ठ शेतकरी व संस्थांचा होणार सन्मान

– धनंजय मुंडे

– पुरस्कारांच्या रक्कमेत चार पटीने वाढ

मुंबई़ :- सन 2020, 2021 व 2022 करिता कृषी विभागामार्फत देण्यात येणारे शेतकरी व शेतीशी संबंधित संस्था यांचा सन्मान करणाऱ्या शासकीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व तत्सम संस्थांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी व सर्वसाधारण गट), पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

सन 2020 पासून कोरोनाच्या संकटाच्या काळात या पुरस्कारांच्या वितरणात खंड पडला होता. दरम्यान धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून या तीनही वर्षातील कृषी विभागाच्या पुरस्कारांचे वितरण करण्याबाबत ते आग्रही होते. त्यानुसार सन 2020, 2021 व 2022 मधील पुरस्कारांची विभागनिहाय घोषणा करण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांच्या सोबतीने प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते, त्या रकमेतही मंत्री मुंडे यांनी नुकतीच तब्बल चार पटीने वाढ केली आहे.

दरम्यान लवकरच या पुरस्कारांचे शासन स्तरावर कार्यक्रम आयोजित करून वितरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

Sat Feb 24 , 2024
मुंबई :- राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली. राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार होती. राज्यात उमेदवारीचा अर्ज मागे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com