जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी दिरास अटक 

नागपूर :- दिनांक ०९.०६.२०२३ चे १९.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे कोतवाली प्लॉट न. ५०४, भुतिया दरवाजा, दसरा रोड, तुळशीबाग येथे राहणार्या फिर्यादी हिना शेख सादीक शेख ३० वर्षं यांना घरघुती भांडणाचे कारणावरून आरोपी तिचा दिर नामे सरफराज उर्फ तपी शेख वल्द बबु शेख वय ३४ वर्ष रा. बड़ी मस्जिद जवळ, हसनबाग याने फिर्यादीचे राहते घरी येवुन तिचे सोबत भांडण करून, पांढऱ्या रंगाचे कटरने तिचे गालावर मारून जखमी केले तसेच लाल रंगाचे दुपट्टयाने गळा आवळुन तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जख्मी फिर्यादी हिला उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आलेले आहे. उपचार सुरू आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कोतवाली येथे पोतपनि सोनपरा ९२३४२९३४० यांनी आरोपांविरुध्द कलम ३०७ ४५२ भादवि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी यास अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय नौदलात वैमानिक म्हणून निवड झालेल्या सिद्धी दुबे हिचा सुरेश भोयर यांच्या हस्ते सत्कार

Sun Jun 11 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत हद्दीतील भूषण नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर नंदकिशोर दुबे यांची नात सिद्धी हेमंत दुबे या युवतीने लष्करात वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सिद्धी हेमंत दुबे हिची भारतीय नौदलात वैमानिक म्हणून निवड झाली आहे. त्याप्रित्यार्थ नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी रविवार (ता.११) रोजी भूषण नगर येरखेडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com