नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. १ पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, कावरापेठ, रेल्वे कॉसिंग पुलीया जवळ, दोन ते तिन इसम घातक शस्त्रसह आहेत. अशा माहीतीवरून नमुद ठिकाणी जावुन रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी क. १) शेख दिलदार वल्द शेख नसरुद्दीन, वय २७ वर्षे, २) शेख रियाज शेख कासीम, वय २९ वर्षे, ३) शेखख टायगर शेख नसरूद्यीन, वय १९ वर्षे, तिन्ही रा. महाराजपुर डाकबंगला, जि. साहेबगंज, पोलीस ठाणे तेलझाडी, झाडखंड हे मिळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे ताब्यातुन एक काळया रंगाची सँग बंग, दोन लोखंडी चाकु, एक व्हीवो कंपनीचा मोबाईल, एक मोटोरोला कंपनीना व एक वन प्लस कंपीचा मोबाईल व एक साधा मोबाईल तसेच रोख १,४२०/- रू असा एकूण ३५,७२०/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला.
आरोपी हे बेकायदेशीररित्या शस्त्र सह कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्द्देशाने समक्ष मिळुन आल्याने तसेच, त्यांनी सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, त्यांचे विरूध्द पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ४/२५ भा.ह.का. सहकलम १३५ महा.पो.का. अन्वये गुन्हा नोंद करून जप्त मुद्देमालासह आरोपींना यशोधरानगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, युनिट क. १ चे पोनि. सुहास चौधरी, पोहवा. बबन राऊत, सुनित गुजर, नितीन वासनिक, रितेश तुमडाम, सोनू भावरे, योगेश वासनिक, पोअं. शिवशंकर रोठे, स्वप्नील खोडके, नितीन बोपूलकर, रविन्द्र खेडेकर यांनी केली.