संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत कृषी विभागामार्फत 25 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने कामठी तालुक्यात प्रत्येक दिवशी नियोजित गावात कृषी विषयक विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
या सप्ताह अंतर्गत कामठी तालुक्यातील खसाळा, नांदा, आजनी,येरखेडा,भोवरी,शिरपूर,आसलवाडा,जाखेगाव,तरोडी, एकर्डी,शिवणी,उनगाव ,चिंचोली ,कोराडी गावातून प्रथम दिनी कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिन राबवण्यात आला.तर आज 26 जून ला घोरपड, गुमथी, केम गावात कृषी संजीवनी कार्यक्रम राबविण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना पौष्टीक भरड धान्य यांचे आहारा तिल महत्व , बीज प्रक्रिया,बियाणे उगवणक्षमता तपासणी, कापूस ,सोयाबीन व भात पिकामध्ये एक गाव एक वाण,कापूस पिकाची रुंद सरी वरंबावर लागवड, धान पिकात पट्टा पद्धतीने लागवड, निंबोळी अर्क तयार करणे, पी एम किसान, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया व कृषी विभागाच्या विविधयोजनांची माहिती देण्यात आली.सदर कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत 26 जून रोजी पौष्टिक आहार प्रसार दिन, 27 जून रोजी कृषी महिला शेतकरी सम्मान दिन, 28 जून ला जमीन सुपीकता जागृती दिन, 29 जुन ला कृषी क्षेत्राची भावी दिशा,30 जून ला कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन राबविण्यात येणार आहे तर 1 जुलै ला कृषी दिन साजरा करून सप्ताहची सांगता करता येणार आहे.