सावनेर :- अंतर्गत वार्ड क्र. ४ वाकीपुरा पाटणसावंगी सावनेर येथे दिनांक १४/०१/२०२४ थे ०३,४५ वा. ते ०४.३० वा. दरम्यान फिर्यादी नामे विनोद रामकूणाजी डाखोळे वय ४५ वर्षे रा. वार्ड क्र. ४ वाकीपुरा पाटणसावंगी सावनेर हे आपल्या घरी झोपले असता घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या घराचा दरवाजा धकवून घरात प्रवेश करून घरफोडी करण्याचा प्रयत्ल केला तसेच आरोपी नामे-१) आकाश विलास लांजेवार रा रामकृष्ण अपार्टमेंट जवळ कुंभार टोला नंदनवन नागपूर, २) सुरज उर्फ मकवा संजय कोहळे रा जुना बगडगंज कुंभार टोली नंदनवन नागपूर यांचे जवळ असलेल्या हुडाई कंपनीच्या कार क्र. एम. एच. ०२/सि.बी.-९७२५ जुनी वापरती किंमती १०००००/- ची झडती घेतली असता त्यामध्ये घरफोडीचे साहीत्य, तलवार व कारसह मिळून आल्याने आरोपीतांकडून मुद्देमाल जप्त करून व आरोपीतांना ताब्यात घेतले वरील दोन्ही आरोपीतांविरूद्व पोस्टे ला गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीताविरुष्ट्र कलम ४५८, ३८०, ५११, ३४ भांदवि, सहकलम ४, २५ शरख अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर आरोपीतांना अटक करण्यात आली असून सदर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक दोनोडे यांनी भेट दिली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अनिरीक्षक दोनोडे, हे करीत आहे.