भिवापूर :- अंतर्गत १०० मी अंतरावरील पो.स्टे. भिवापुर टी पॉईंट येथे दिनांक १२/०५/२०२३ चे ०५/४५ वा. दरम्यान फिर्यादी हे पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन भिवापूर टी पॉईंट येथून काही इसम रेतीची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनीय खबरेवरून नाकाबंदी केली असता यातील आरोपी नामे- संजय पतिराम रणदिवे, वय ३४ वर्ष, रा. नवेगाव बांध ता. मोरगाव अजुर्नि जि. गोदिया याने त्याचे ताब्यातील टिप्पर वाहन क्र. एम. एच. ४० / बि.जी- ६३८८ मध्ये ०६ ब्रास रेती किंमती तीस हजार रूपये तसेच १० बाकी टिप्पर क्रमांक एम. असा एकूण एच. ४० बि.जी- ६३८८ किमती वीस लाख रूपये असा एकूण वीस लाख तीस हजार रूपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विना परवाना चोरी करून वाहतुक करतांना मिळुन आल्याने वाहनासह २०,३०,००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी सरकार तर्फे पोहवा / १३९५ राकेश छेदीलाल त्रिपाठी पोस्टे भिवापूर येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि.भस्मे पोस्टे भिवापूर हे करीत आहे.. सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन भिवापूर येथील ठाणेदार जयपालसिंग गिरासे, पोलीस हवालदार राकेश त्रिपाठी, पोलीस शिपाई अजय झाडे यानी केली.