अवैधरीत्या रेतीची साठवणुक करून विक्री करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा नोंद

नागपूर :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी नागपूर जिल्हयात अवैध धदयावर कारवाई करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथक हे अवैध धंदयावर कारवाई करीत असतांना दिनांक १६/०१/२०२४ चे ०९.१५ वा. ते ११.१० वा. सुमारास गोपनीय सुत्रधारकांकडुन मिळालेल्या माहितीवरून पोस्टे मौदा येथील माथनी येथे नाकाबंदी करीत असता यातील आरोपीतांनी संगणमत करून, आरोपी मालकांचे सांगणेप्रमाणे स्वतःचे आर्थीक फायद्या करीता शासनाची दिशाभूल करून एका रॉयल्टीवर ३ वाहने १) १२ चक्का टिप्पर वाहन क्र. एम. एच. ४०/सि.टी. ७४७५, २) १० चक्का टिप्पर वाहन क्र. एम. एच. ४०/ए.टी. ७४७५, आणि ३) १० चक्का टिप्पर वाहन क्र. एम.एच. ४०/ सि.एम. ७४७५ असे ३ वेगवेगळे वाहनांची सिरीज वेगवेगळी मात्र नंबर सारखेच चालवुन, रेती नांदेड येथुन लोड करून मौदा येथील रूट नसतांना माचनी मौदा नागपुर येथे आरोपीने आपले घरासमोर अनाधिकृतपणे साठवणुक करून, ईतर साथीदारांचे मदतीने जेसिबी आणुन अवैध विक्री करीत असल्याचे आढळुन आलेले आहे.

यातील आरोपी क्र. १) प्रकाश भय्याजी शिवणकर वय ३४ वर्ष, रा. वार्ड क्र. २ स्वराज्य नगर, मुंदडे लेआउट माथनी, तह. मौदा, जिल्हा नागपुर, चालक व मालक (१) एम. एच. ४० सि.टी. ७४७५ आणि २) एम. एच. ४० ए.टी. ७४७५ या दोन्ही वाहनाचा मालक तसेच एम. एच. ४० ए. टी. ७४७५ चा चालक), २) विशाल वसंता पुडके, वय २९ वर्ष (एम.एच. ४०/सि.टी. ७४७५ चा चालक), ३) विनोद जबदीश सैनी वय ३२ वर्ष, रा. हासपुर, पोस्ट श्रीमाधवपुर, तह, श्रमाधवपुर, जिल्हा सिख्खर राजस्थान, ह.मु. सि/ओ लक्ष्मीकांत मोथरकर माथनी मौदा, जिल्हा, नागपुर यांचे गरी किरायाने, (एम.एच.-४०/सि.एच. ४७३८ चा मालक), ४) मिलींद कोकाटे, वय ३० वर्ष, रा. माथनी, तह. मौदा, जिल्हा नागपुर, (एम.एच. ४०/ सि. एच.-४७३८ चा ऑपरेटर) आरोपीताविरूद्ध कलम ४२०, ३७९, १०९, ३४ भारतीय दंडविधान संहीता १८६०, सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६, सहकलम ४, २१ खानी आणि खनीजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७, सहकलम ३, ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतीबंधक अधिनियम १९८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीतांकडुन १) एक पांडया निळ्या रंगाचे टाटा कंपनीचे १२ चक्का टिप्पर एम. एच. ४० सि.टी. ७४७५ किंमती ४५,००,०००/-रू. २) एक पांढऱ्या निळ्या रंगाचे टाटा कंपनीचे १२ चक्का टिपर एम, एव, ४० सि.टी. ७४७५ मध्ये ०४ ब्रास रेती प्रत्येकी ५०००/- रू. प्रमाणे किमती २०,०००/-रु., ३) एम. एच. ४० ए.टी. ७४७५ मध्ये ०५ ग्रास रेती किमती २५,०००/-रू. ४) एक पिवळया रंगाची जेसीबी वाहन क्र. एम.एच-४०/सि.एच-४७३८ किंमती ३०,००,०००/- रू. ५) विविध कंपनीचे मोवाईल व इतर साहित्य २५५१०००/-रू. असा एकुण १,००,९६,०००/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक  नागपूर (ग्रामीण) हर्ष पोद्दार (भा.पो.से.) तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमित पांडे, पोहवा ललीत उईके, पोना प्रणय बनाफर, कार्तिक पुरी, बालाजी बारगुले, शुभम मोरोकार विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पर्यावरणास अपायकारक असणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपीताविरूद्ध कार्यवाही

Wed Jan 17 , 2024
खापरखेडा :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर खापरखेडा येथे दिनांक १५/०१/२०२४ ने १८/०० वा. ते १९/०० वा. दरम्यान फिर्यादी आपले स्टाफसह पोस्टे परिसरात प्रोवीशन जुगार रेड करीत असताना गुप्त बातमीद्वारे मिळालेल्या माहितीवरून यातील आरोपी नामे १) आर्यन संदीप फुलझरे, वय १८वर्ष २) संतोष हिरालाल गुप्ता, वय ५० वर्ष दोन्ही रा. वार्ड क्रमांक ०३ खापरखेडा हे आपल्या घरी ५ चक्री नायलॉन मांजा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com