सरकारी कामात अडथळा आणून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना घातक शस्त्रासह अटक.
नागपूर :- पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत यशवंत नगर, टर्निंग पाईन्ट येथे नागपुर महानगर पालिकेचे कर्मचारी / फिर्यादी आनंद माधवराव सातपुते त्यांचे सहकारी कर्मचारी यांचेसह पावसाळी पाण्याचे चेंबर शोधण्याकरीता जेसिबी मशीन द्वारे खोदकाम करीत असता डागा ले आउट येथुन आलेल्या आरोपी १) पियूष गजानन काळबांडे वय १९ वर्ष २) पृथ्वीराज ब्राम्हणे वय २५ वर्ष ३) समीर रूपचंद दुपारे वय २९ वर्ष सर्व रा. अंबाझरी टेकडी, भिम चौक यांनी येवुन फिर्यादी व साथिदारांना शिवीगाळ करून हातबुक्काने मारहाण केली. आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. आरोपींनी काही वेळाने पुन्हा येवून आरोपी समीर रूपचंद दुपारे याने हातातील तलवार फिर्यादीवर उगारली फिर्यादीने ती पकडल्याने त्याचे डावे बोटाला जखम झाली. आरोपी शैलेष याने त्याचे जवळील गुप्ती फिरवल्याने फिर्यादीचे सहकारी विक्रम चव्हाण यांना लागून ते जखमी झाले. जख्मी यांचेवर उपचार करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारी वरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे सपोनि बोधने यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, २७९, ३४ भादंवी सहकलम ४/२५ भा.ह कायदाअन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेवून आरोपींना अटक केले आहे. आरोपीचे ताब्यातून लाकडी दांडा असलेली गुप्ती व लोखंडी तलवार जप्त करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.