संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ईस्माईलपुरा रहिवासी एक तरुण घरी गाडीवर कामाला जात असल्याचे सांगून काल सकाळी साडे नऊ वाजता घराबाहेर पडला मात्र देवलापार शिवणी मार्गावर झालेल्या अपघातात सदर तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असून मृतक तरुणाचे नाव सोहेल दानिश हिमायु अन्सारी वय 21 वर्षे रा इस्माईलपुरा कामठी असे आहे. यासंदर्भात पोलिसांनी तूर्तास अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.