शिवणी ( भों. ) जवळ अपघात, तरुणाचा मृत्यु

रामटेक :- नागपुर येथे मुलासाठी मुलगी पहायला गेलेल्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील २८ वर्षीय तरुणाचा चारचाकी वाहन पलटल्याने मृत्यु झाल्याची घटना आज दि. २५ नोव्हेंबर ला रात्री १.३० वाजताच्या सुमारास तुमसर मार्गावरील शिवणी ( भोंडकी ) गावाजवळ घडली.

मृतकाचे नाव अतुल जिवनलाल कावरे वय २८ वर्ष रा. गोबरवाही ता. तुमसर असे असुन तो वडील जिवनलाल कावरे व आई जसवंता कावरे यांचेसोबत नागपुर येथे मुलगी पहायला गेलेला होता. मुलगी पहान्याचा कार्यक्रम आटोपल्यावर रात्रीच्या सुमारास ते आपल्या चारचाकी वाहन क्र. एम.एच. ०५ ए.जे. ६६८७ ने तुमसर मार्गे गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान शिवणी ( भोंडकी ) जवळ रात्री १.३० वाजता दरम्यान समोरून ट्रक च्या लाईट चा प्रकाश डोळ्यावर पडल्याने अतुल चे वाहनावरून नियंत्रण सुटले व कार शेतातील बांध्यांमध्ये जाऊन पलटली. यात अतुल च्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. तिघांनाही उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आणले असता डॉक्टरांनी अतुलला मृत घोषीत केले. रामटेक पोलिसांनी कलम २७९, ३३७, ३०४ ( अ ) भा. दं. वी . नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे यांचेसह पोलीस शिपाई परसराय हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छात्रों को परेशानी न हो- सलिल देशमुख

Sat Nov 26 , 2022
काटोल :-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग के नागपूर विभागीय नियंत्रक कार्यालय में काटोल विधानसभा सभा चुनाव क्षेत्र के ग्रामीण आंचल के स्कूल-महाविद्यालयीन छत्रों के स्कूल के समय पर आवाजाही के लिये समय पर बस सेवा उपलब्ध राखी जाय, इस विषय पर जनक्षोभ सदस्य सलिल देशमुख के प्रमुखता में काटोल नरखेड के जन प्रतिनिधीयों का शिष्टमंडल रा प नि के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com