पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.29 डिसेंबर 2022 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी, येथे पंडीत दिनदयाल रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

सदर रोजगार मेळाव्याकरीता इच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांची झेरॉक्ससह स्वखर्चाने दि.29 डिसेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली,व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी, या कार्यालयाने केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. दुरध्वनी क्रंमाक 07132-222368 हा आहे.

NewsToday24x7

Next Post

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेशाबाबत

Tue Dec 27 , 2022
गडचिरोली : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2023-24 करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा व दिनांक 01 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com