नागपुर – आज आम आदमी पार्टी ने सेन्ट फ्रांसिस डि सेल कथ्रीडल येथे आर्चबिशप एलियास गोंसाल्विस यांच्या बरोबर क्रिसमस साजरा केला. आम आदमी पार्टीचे शिष्टमंडळ विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात आर्चबिशप यांना भेटले. यावेळी प्रामुख्याने नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, उत्तर नागपूर अध्यक्ष रोशन डोंगरे, सहसचिव मयांक यादव बरोबर क्रिश्चन शिष्टमंडळ सुनील म्याथिव, विल्सन लियनार्ड, डेविड क्लेमेंट, पीटर प्याट्रिक, जोसेप माइकल, रेमोना माइकल, जेरोम मचाड़े, रोहित देशब्रधार, वैभव कोरोलिओंन हे उपस्थित होते.
यावेळी आर्चबिशप यांनी आम आदमी पार्टी बरोबर केक कापला व सर्व समविचारी पक्ष्यांसाठी त्यांनी प्रार्थना केली. आम आदमी पार्टी प्रभु येशु च्या शांति संदेशा तुन प्रेरणा घेऊन सर्व भारतीय समाजासाठी काम करीत आहे.