आम आदमी पार्टी महाराष्ट्र मधील संघटनेत ने केले मोठे फेरबदल, विदर्भात नवीन जबाबदाऱ्या

– महाराष्ट्र आम आदमी पार्टी संघटनेत विविध पदांवर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या

– महाराष्ट्रात आम आदमी पार्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पार्टीत विविध पदाधिकाऱ्यांची काल नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर :-आम आदमी पार्टी नेते गोपाल इटालिया यांनी सदर समितीची घोषणा करताना सांगितले की यापुढे महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेपर्यंत आम आदमी पार्टीची ध्येय धोरणे तसेच दिल्ली आणि पंजाब मधील जनहिताची केलेल्या कामांची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवितील, तसेच राज्याच्या प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात लोकांच्या समश्या सोडविण्याचे आटोकाट प्रयत्न करतील, भ्रष्टाचाराविरोधात पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील असे ही ईटालिया यांनी सांगितले.

राज्य संघटनेच्या नियुक्तीत स्टेट कॅम्पेन ईन्चार्ज रंगा राचुरे, उपाध्यक्ष विजय कुंभार, उपाध्यक्ष धनंजय शिंदे, संघटन सचिव संदीप देसाई, अजित फाटके, नविंदर सिंग अहलुवालिया, भूषण ढाकुलकर , मनिष मोडक, हनुमंत चाटे, अजित खोत, रियाज पठाण, महिला आघाडी अध्यक्षा सीमा गुट्टे, युवा आघाडी अध्यक्ष मयूर दौंडकर, राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार, समिती सदस्य देवेंद्र वानखेडे आणि संजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण ढाकुलकर यांना महाराष्ट्र राज्य संघठन सचिव बनवीण्यात आले आहे व तसेच पूर्व विदर्भ ची ही जबाबदारी देण्यात आली आहे, पूर्व विदर्भ – नागपुर, गोंदिया, गडचिरोली,चंद्रपुर, वर्धा, भंडारा, या मध्ये. जिल्हा / महानगरपालिका कमिटी ते बूथ कमिटी उभारनिपर्यंत संघटनेच्या विस्तारासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.

आप पार्टीला आणखी मजबूत बनवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यापासून तर तालुकापर्यंत आणखी मोठ्या प्रमाणात नियुक्त्या दिल्या जातील असे गोपाल इटालिया यांनी सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Side middle berth to be removed from Nagpur-Pune Garib Rath - Dr. Pravin Dabli demanded from the railway administration

Wed Jul 12 , 2023
Nagpur :-  During the tenure of the then Railway Minister Lalu Prasad Yadav, side middle berths were installed in Garib Rath Express along with most of the trains. Due to which the passengers had to face a lot of trouble. After registering a strong protest by Pravin Dabli from Nagpur, it started protesting all over the country. After strong protest, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!