संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौक येरखेडा येथे उधारीचे पैसे परत मागायला आलेल्या तरुणाशी झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला गेल्याने पैसे मागायला आलेल्या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी साहित्य ने मारहाण करून जख्मि केल्याची घटना काल सायंकाळी साडे सहा दरम्यान घडली असून जख्मि फिर्यादी तरुणाचे नाव अमित सुरज राऊत वय 37 वर्षे रा बजरंग पार्क,कामठी असे आहे सदर जख्मि फिर्यादिने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी सतवंत वरखळे वय 34 वर्षे रा दुर्गा चौक येरखेडा कामठी विरुद्ध कलम 118(1),बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.